इंटरनेट नसलं तरी बिलिंग · Android

बिलिंग आणि उधारी खाता,
इंटरनेटशिवायही.

बिल पूर्ण होतं, उत्तरही मिळतं. नेटवर्क गेलं तरी प्रत्येक बिल पूर्ण होतं, तुमच्याकडच्या फोनवरच. वस्तू टॅप करा, बारकोड स्कॅन करा किंवा बोलून बिल करा, आणि साथी AI ला मराठीत तुमच्या दुकानाबद्दल विचारा.

Free प्लॅन कायमचा. कार्ड नको, जागा राखण्यासाठी एकही पैसा नाही.

Read in English

0
बिल हरवत नाही, पैसे दोनदा कटत नाहीत. नेटवर्क गेलं तरी बिल फोनवरच पूर्ण होतं.
5,000+
तयार वस्तू, बारकोड, नाव आणि MRP सह. टाइप करू नका, फक्त टिक करा.
7
स्टाफ रोल, प्रत्येकाला फक्त त्याचं काम दिसतं (सातही Pro वर). कॅशियरला तुमची खरेदी किंमत किंवा नफा दिसत नाही.
₹4
दिवसाला, Plus च्या वार्षिक प्लॅनवर. बिलिंग कधीच बंद होत नाही.

काउंटरला जे लागतं, ते सगळं. जे नको, ते काहीच नाही.

नेटवर्क गेलं, विक्री थांबत नाही

शोध, कार्ट, पेमेंट आणि पावती सगळं फोनवर चालतं. बिल नंतर आपोआप अपलोड होतं, आणि पुन्हा प्रयत्न केला तरी ग्राहकाचे पैसे दोनदा कटत नाहीत.

वस्तू टाइप नको, टिक करा

5,000+ पॅक वस्तू बारकोड, नाव आणि MRP सह आधीच तयार आहेत. “Build your shop” दाबा, जे विकता त्यावर टिक करा, आणि किंमत MRP पासून सुरू होते.

उधारी खाता फोनमध्ये

कोणाकडे किती बाकी आणि किती दिवसांपासून, एका नजरेत. एका टॅपमध्ये व्हॉट्सॲपवर आठवण पाठवा.

बोलून बिल करा

“दोन किलो कोलम तांदूळ आणि एक पार्ले-जी” असं बोला. तुम्ही तपासून “Add” दाबेपर्यंत बिलात काहीच जात नाही. यासाठी इंटरनेट लागतं.

दिवस बंद, गल्ला मोजून

नोटा मोजा, आणि गल्ल्यात किती कमी किंवा जास्त आहे आणि तो हिशोब कसा आला, ते ॲप सांगतं.

स्टाफला फक्त त्याचं काम दिसतं

7 रोल: मालक, पार्टनर, मॅनेजर, कॅशियर, स्टॉक कीपर, डिलिव्हरी आणि अकाउंटंट (सगळे Pro वर). तुमच्या CA चं लॉगिन प्रत्येक प्लॅनवर मोफत.

साथी AI ला विचारा

“आज किती विक्री झाली?” “सगळ्यात जास्त उधारी कोणाकडे?” साथी AI तुमच्याच खात्यावरून आणि विक्रीवरून उत्तर देतो. नेहमीच्या प्रश्नांची उत्तरं नेटवर्कशिवायही.

या खऱ्या स्क्रीन आहेत, डिझाइन नाही.

आमच्या डेमो किराणा दुकानातल्या खऱ्या स्क्रीन. ॲप मराठी, हिंदी आणि इंग्रजीत चालतं.

DukanUp उधारी खाता: 8 ग्राहकांकडे ₹11,649.25 बाकी
उधारी खाता: कोणाकडे किती, किती दिवसांपासून
DukanUp मध्ये दिवस बंद: गल्ला ₹19 कमी, आणि हिशोब कसा आला
दिवस बंद: गल्ला ₹19 कमी, आणि का
DukanUp मध्ये स्टाफ: मालक, कॅशियर आणि स्टॉक कीपर
स्टाफ: प्रत्येकाचा वेगळा रोल

सुरुवात मोफत. बिलिंग कधीच बंद नाही.

Free

₹0, कायमचा

एक काउंटर, अमर्याद बिलं, 25 ग्राहकांपर्यंत उधारी खाता.

Plus

₹149 महिना

वार्षिक ₹1,499. अमर्याद उधारी ग्राहक, सगळे रिपोर्ट, होलसेलरचं देणं, साथी AI.

सगळे प्लॅन पहा (इंग्रजीत) →

दुकानदार सगळ्यात आधी हेच विचारतात

इंटरनेट नसताना खरंच बिलिंग होतं का?

हो. वस्तू शोधणं, कार्ट, पेमेंट, पावती आणि स्टॉक कमी होणं, सगळं फोनवर होतं. बिल नंतर आपोआप अपलोड होतं.

मला सगळ्या वस्तू टाइप कराव्या लागतील का?

नाही. 5,000+ पॅक वस्तू बारकोड, नाव आणि MRP सह तयार आहेत, जे विकता त्यावर फक्त टिक करा. सुट्या मालाचं आणि तुमच्या स्वतःच्या वस्तूंचं फक्त नाव आणि किंमत टाका.

ॲप मराठीत आहे का?

हो. ॲप, पावती आणि साथी AI ची उत्तरं, सगळं मराठी, हिंदी आणि इंग्रजीत.

याची किंमत किती?

Free प्लॅन कायमचा मोफत आहे, अमर्याद बिलांसह. Plus ₹149 महिना. तुमच्या CA चं लॉगिन प्रत्येक प्लॅनवर मोफत.

पुढचं बिल DukanUp वर करा.

सुरुवात मोफत. तुमचा डेटा तुमचाच, हवा तेव्हा काढा किंवा पुसून टाका.

WhatsApp